देश

आरे प्रकरणी विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र; उद्या होणार सुनावणी

आरे वृक्षतोडप्रकरणी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिले आहे. या पत्राची दखल घेत सुप्रिम कोर्टाने घेतली असून उद्या 7 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे.

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना रविवारी सकाळी आरे वृक्षतोडप्रकरणी एक पत्र लिहिले होते. यामध्ये सुप्रीम कोर्टाने मुंबईतील आरे प्रकरणाची दखल घेत यामध्ये हस्तक्षेप करावा. तसेच मुंबई महापालिका, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि मुंबई पोलिसांकडून सुरु असलेल्या आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of