देश

‘आरे’तील वृक्षतोड त्वरीत थांबवाः सर्वाच्च न्यायालय

आरे वृक्षतोड प्रकरणी सर्वाच्च न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोड तात्काळ थांबविण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आरे प्रकरणात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी शिष्टमंडळाने काल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांना पत्र लिहले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय सोमवारी विशेष खंडीपीठात या प्रकरणाची सुनावणी केली. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर स्थगिती आणली आहे.

मेट्रो कारशेडसाठी सुमारे 2 हजार 600 झाडे तोडावी लागणार आहेत. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल सुरू करण्यात आली. रात्रभरात 1 हजार झाडे इलेक्‍ट्रिक कटरच्या साह्याने कापण्यात आली. दरम्यान, याच वृक्षतोडीला स्थगिती आणण्यासाठी विद्यार्थी शिष्टमंडळाने सर्वोच्च न्यायालयात पत्र लिहीले होते. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश अरूण मिश्रा आणि न्यायाधिश अशोक भूषण यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of