देश

रेल्वे प्रवाशांना मिळणार आता नुकसान भरपाई

आता ट्रेनला यायला उशीर झाल्यावर प्रवाशांना नुकसान भरपाई मिळणार आहे. देशातील पहिली खासगी ट्रेन ‘तेजस एक्स्प्रेस’ला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई दिली जाणार आहे.

शनिवारी नवी दिल्ली लखनऊ तेजस एक्सप्रेस सव्वा तीन तास उशिरा दिल्लीत पोहोचली. रेल्वेकडून आयआरसीटीसी ही ट्रेन चालवते. नियमांनुसार, या ट्रेनला १ तास उशिर झाल्यास १०० रुपये आणि २ तासांहून अधिक उशिर झाल्यास २५० रुपये नुकसान भरपाई आहे. लखनऊ ते दिल्ली जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये ४५१ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना २५० रुपयांची नुकसान भरपाई मिळणार असल्याची महिती मिळत आहे. सर्व प्रवाशांना याबाबत मेसेज पाठवण्यात आला आहे. त्यात पाठवण्यात आलेल्या लिंकच्या आधारे प्रवासी आपल्या नुकसान भरपाईचा दावा करु शकत असल्याचे आयआरसीटीसीने सांगितले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of