देश

कर्नाटक राज्य झालं लॉकडाऊन फ्री

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उद्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू नसल्याची घोषणा केली आहे. आता कर्नाटक हे लॉकडाऊन फ्री राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

“उद्यापासून राज्यात लॉकडाउन होणार नाही. लोकांनी आता कमावर परतायला हवं. अर्थव्यवस्थेला हातभार लागणं हे गरजेचं आहे. अर्थव्यवस्था सुरळीत राखून आपल्याला कोरोनाचा सामना करायचा आहे. लॉकडाउन हे समस्येवरचा उपाय नाही. कन्टेनमेंट झोनचा अपवाद वगळता आता कुठेही निर्बंध नसतील.” यावेळी बोलत असताना येडियुरप्पांनी राज्यातील जनतेला सरकारने आखून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं. बाहेर जाताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, स्वच्छता यासारख्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं येडियुरप्पा म्हणाले. सध्याच्या घडीला कोरोनाचा सामना करण्यासाठी हाच उपाय असल्यामुळे नागरिकांनी सरकारी यंत्रणांना मदत करावी असं आवाहनही येडियुरप्पांनी केलं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of