देश

‘या’ आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वयाच्या 60 व्या वर्षी रुग्णालयात कोविड-19 च्या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी तमोनाश घोष यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

तमोनाश घोष यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होत असल्याने सध्या चिंता वाढली आहे. तामिळनाडूमधील नेत्याचं निधन झाल्यानंतर आता तमोनाश घोष यांच्या निधनाचं वृत्त आलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of