गुन्हेगारी देश

मोठी बातमी: दिल्ली हिंसाचार प्रकरणात उमर खालिदला अटक

दिल्ली हिंसाचार प्रकरणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयु) माजी विद्यार्थ्यी उमर खालिदला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.

उमर खालिदला बेकायदेशीर प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आज त्याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. रविवारी लोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर रविवारी तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

दरम्यान दिल्लीच्या पूर्वोत्तर जिल्ह्यात 23 ते 26 फेब्रुवारीमध्ये दंगल झाली होती. पोलिसांनी याच प्रकरणात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात या सर्वांची नावं आहेत. या दंगलीत 53 लोक ठार झाली होती आणि 581 लोक जखमी झाले होते, त्यापैकी 97 जण गोळी लागल्यामुळे जखमी झाले आहेत. पोलिसांनी या बड्याल लोकांना तीन विद्यार्थिनींच्या वक्तव्याच्या आधारे आरोपी बनवलं आहे.

कोण आहे उमर खालिद?

उमर खलिद हा दिल्लीतील झाकिरनगर परिसरात राहायचा. जेएनयूतील समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास या विषयात एमए आणि एम- फिल केले आहे. सध्या तो जेएनयूतून पीएचडी करत आहे. 2016 मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्यासंदर्भात विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी नारे देण्यात आल्याचे समोर आले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासूनच देशभरात उमर खालिद चर्चेचा विषय ठरला.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of