देश विदेश

धक्कादायक; अमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2600 रुग्ण आढळतायेत

अमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2 हजार 600 रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुरुवातीला करोना व्हायरस हा प्रकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. त्यांनी या व्हायरसला चायना व्हायरस वगैरे अशी नावंही ठेवली. तसंच सातत्याने या मुद्द्यावरुन चीनवर टीकाही केली. मात्र आता त्यांनी त्यांचा सूर बदलला आहे. देशातली कोरोनाची स्थिती त्यांना ठाऊक आहे म्हणूनच त्यांनीही मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मास्क वापरण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. अमेरिकेत सध्याच्या घडीला मिनिटाला ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.

आत्तापर्यंत अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या 40 लाखापर्यंत गेली आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of