गुन्हेगारी

कारागृहात नवऱ्याला भेटायला गेलेल्या महिलेवर रेल्वे अधिकाऱ्याकडून बलात्कार

पिपलानी पोलिसांना एका महिलेच्या तक्रारीनंतर रेल्वेच्या निवृत्त अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिला आपल्या नवऱ्याला भेटायला कारागृहात आली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

महिलेचा नवरा आणि आरोपीचा मुलगा भोपाळमधील मध्यवर्ती कारगृहात कैद आहे. कारागृहाच्या बाहेर दोघांची भेट झाली होती. पोलिसांना आरोपीला अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर निवसी 46 महिलेचा नवरा चेक बाउन्स प्रकरणी शिक्षा भोगत आहे. महिला आपल्या नवऱ्याला भेटायला नेहमी येत असे. कारागृहाच्या बाहेर महिलेची ओळख रेल्वेचा निवृत्त अधिकारी राजेंद्र शर्मा याच्याशी झाली. दोघे एकमेकांशी फोनवर बोलत होते.

दरम्यान 4 जानेवारी रोजी महिला आपल्या नवऱ्याला भेटायला आली. त्याचवेळी आरोपीची आणि महिलेची भेट झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला आयोध्या बायपासजवळील बंद पडलेल्या हॉस्टेलमध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिला नागपूरला परतली. मात्र पुन्हा दुसऱ्या पीडित महिला भोपाळला गेली असताना वेळी आरोपी महिलेवर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर महिलेने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of