गुन्हेगारी

गणपतीची वर्गणी न दिल्याने तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड

ganpati fund, pune, beaten group

पुण्यातील वाकड येथे गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून टोळक्यांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला मारहाण केली आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.

आरोपी सागर हा वाकड परिसरातील सदगुरू कॉलनीत राहतो. तर फिर्यादी यांचे त्याच परिसरात माताजी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. कॉलनीत ओम साई गणपती मंडळ असून त्याची ५ हजार वर्गणी का देत नाहीत म्हणून मध्यरात्री आरोपीने फिर्यादी यांच्या बंद दुकानाची जाळी जोरजोरात वाजविली. तेव्हा, फिर्यादी आणि जखमी भाऊ मुकेश चौधरी, आई जमनीबाई चौधरी हे त्याला विरोध करत होते. त्यावेळी आरोपी सागरने 10 जणांचे टोळके बोलावले आणि त्यांना मारायला सुरुवात केली. वर्गणी देत नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. सागरने लोखंडी पाईप फिर्यादी यांचे भाऊ मुकेश यांच्या डोक्यात टाकला त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहे. फिर्यादी आणि त्यांच्या आई यांना देखील मारहाण झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of