गुन्हेगारी पुणे

डीएस कुलकर्णींच्या भावाला मुंबई विमानतळावरुन अटक

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डीएस कुलकर्णी यांच्या भावाला मुंबई विमानतळावरुन आज ताब्यात घेण्यात आले आहे.

डीएसके घोटाळ्यातील डि.एस.कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी अमेरिकेला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. डीएसके घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मकरंद कुलकर्णी फरार होते. यानंतर पोलिसांनी मकरंद कुलकर्णी यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकणी डीएसके दांपत्य अटकेत आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली हाेती. 2500 हून अधिक गुंतवणुकदारांची 230 काेटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या नातेवाईकांविराेधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of