गुन्हेगारी

डीएस कुलकर्णींच्या भावाला 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी गुंतवणूक दारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत आहेत. तर त्यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी यांना कालच मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात असता न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मकरंद कुलकर्णी काल अमेरिकेला पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मकरंद कुलकर्णी फरार होते. यानंतर पोलिसांनी मकरंद कुलकर्णी यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of