गुन्हेगारी

धक्कादायक; ‘पिंटू’ म्हटल्यावरुन भुसावळात खूण

जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजजवळ असलेल्या खान्देश हॉटेलमध्ये काउंटरवर पिंटू उर्फ विकास वासुदेव साबळे हा दारु पित बसला होता. त्यावेळी निलेश चंद्रकांत ताकदे  यांने विकास वासुदेव साबळेला पिंटू म्हटले यावरुन दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून निलेश चंद्रकांत ताकदे याने कटरने गळ्यावर वार करून विकास वासुदेव साबळे (वय 32, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) या तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. विकास हा नेपानगर येथे रेल्वेत गँगमन आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली. आरोपी नीलेश चंद्रकांत ताकदे (वय-26, रा. जुना सातारा, भुसावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of