गुन्हेगारी महाराष्ट्र

नराधम मामांनी केला भाचीवर बलात्कार

औरंगाबाद – नोकरीसाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच सख्या दोन मामांनी बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे.

अब्दुल्ला खान व शाहरुख खान अशी दोन्ही आरोपी मामांची नावे आहेत. पीडिता तरुणी आणि आरोपी उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताच्या नराधम मामांनी सख्या भाचीला धमकावत तब्बल वर्षभर बलात्कार केला. सततच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने वडिलांना फोन केला, आणि सर्व प्रकार सांगितला.

पीडितेच्या वडिलांनी थेट औरंगाबाद गाठून आरोपींच्या तावडीतून पीडितेची सुटका केली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of