गुन्हेगारी

पतीला जेवणात विष घालून मारणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

पतीला जेवणात विष देऊन मारणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

मुकुंदवाडी परिसरातील राजनगरामध्ये राहणाऱ्या पती विलास दादाराव आव्हाडला वांग्याच्या भाजीतून धोतऱ्याच्या बिया खाऊ घालून त्याचा खून करणाऱ्या पत्नी संगीता आव्हाडला जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. एम.एस. देशपांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने विलासच्या तिन मुलांना विधी सेवा प्राधिकरणाने कायद्यानुसार नुकसान भरपाई द्यावी आणि त्याच्या राहण्याची सोय करावी असे आदेशात नमुद केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of