गुन्हेगारी देश मनोरंजन

पत्नीचा खून करणारा प्रसिद्ध दिग्दर्शक पोलिसांच्या ताब्यात

दक्षिणात्या चित्रपटाचे दिग्दर्शक बालाकृष्णन यांना पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बालाकृष्णन याने पत्नी आणि अभिनेत्री संध्या हिची हत्या करून तिचे तुकडे शहरातील विविध भागातील कचरा कुंडीत फेकले.

संध्या हिच्या हत्येनंतर तब्बल 15 दिवसांनी पोलिसांनी बालाकृष्णन याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याच्या टुकडे करण्यात आलेल्या शरिरावर टॅटू आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी बालाकृष्णन यांना पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. बालाकृष्णन याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.

संध्याचे अनैतिक संबध होते. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडन होत असे. त्यामुळे आपण संध्याची हत्या केल्याचे बालाकृष्णन याने सांगितले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of