गुन्हेगारी

पाणी पुसायला सांगिल्याने 13 वर्षाच्या चिमुकलीची आत्महत्या

घरामध्ये सांडलेले पाणी पुसायला सांगितल्याच्या रागातून तेरा वर्षीय चिमुकलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मानखुर्द मध्ये घडली आहे.

सकिना नुरमहम्मद कुरेशी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. सकिना आई-वडीलांसोबत मानखुर्दमध्ये राहात होती. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी पाणी भरुन झाल्यावर तिच्या आईने तिला घरात सांडलेले पाणी साफ करायला सांगितले. याचा राग येवून तिने गळफास घेत आपले आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of