गुन्हेगारी

मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला अटक

मुंबई

अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी एका सावत्र बापाला बेड्या ठोकल्या.  अतिक शेख अस या आरोपीचे नाव असून तो पीडितेचा सावत्र बाप होता.

मागील तीन महिन्यांपासून आरोपी आपल्या सावत्र मुलीवर अत्याचार करत होता. याची कुणकुण आईला लागल्यानंतर आईने एका एनजीओच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित मुलगी दहावीत शिकत आहे.

दरम्यान आरोपीने पीडित मुलीला तुझ्या आईला आणि मामाला ठार करण्याची धमकी देत आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of