गुन्हेगारी

विद्यार्थ्यांकडून लाच स्विकारणारा मुख्याध्यापकासह शिक्षक अटकेत

12 वी च्या परिक्षेचा 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी दोन विद्यार्थ्यांकडून 10 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली.

भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील लोहारा येथील रतीराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयात ही घटना उघडकीस आली आहे. मुख्याध्यापक शिवनारायण जयराम राणे (५४) आणि सहाय्यक शिक्षक बाबुलाल मोतीराम पटले असे लाचखोर शिक्षकांची नावे आहे. ते दोघेही लोहारी येथील रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत.

१७ नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा देण्यासाठी ते रतीराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना भेटले. त्यावेळी मुख्याध्यापक शिवनाराण राणे यांनी १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रूपये असे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of