गुन्हेगारी

सात वर्षापासून फरार असलेला आरोपी पुन्हा जेरबंद

सात वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट 5 ला यश आले आहे. त्याला रत्नागिरी  पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे.

खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर सुटल्यानंतर गेल्या सात वर्षापासून पसार असलेल्या रफीक शेख (45, रा. मुंब्रा) या फरार आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात आले आहे. पॅरोल रजेवर सुटून आल्यानंतर खूनाच्या गुन्हयातील  शेख हा मुंब्रा परिसरात वास्तव्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे युनिट पाचच्या पथकाने मुंब्रा येथून त्याला 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास ताब्यात घेतले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of