गुन्हेगारी देश

हत्याप्रकरणात भाजप व आरएसएसच्या ९ कार्यकर्त्यांना जन्मठेप

तिरुअनंतपुरम – माकपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९ कार्यकर्ते दोषी आढळले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.

कन्नूर तुरुंगात ६ एप्रिल २००४ मध्ये माकप कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्या हत्या करण्यात आली होती. केरळमधील कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी माकप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात जखमी झालेल्या के. पी. रवींद्रन यांचा नंतर मृत्यू झाला. याप्रकरणी ३१ जणांवर आरोप दाखल करण्यात आले होते. तब्बल १५ वर्षानंतर आता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे.

न्यायालयानं याप्रकरणी ९ जणांचा हत्येत सहभाग असल्याचं सांगत त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of