गुन्हेगारी

धक्कादायक; आईला कोरोनाची लागण झाल्याने 23 वर्षीय मुलाची आत्महत्या

आईला कोरोनाची लागण झाल्याने एका 23 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे.

आईला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे मुलगा नैराश्यात गेला होता. त्यातच तो आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. आईला पाहून घरी परतल्यानंतर मुलानं नैराश्यातून घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. शुक्रवारी मध्यरात्री नाशिकरोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी येथे ही धक्कादायक घटना घडली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of