गुन्हेगारी

चिकन खायची इच्छा पूर्ण न झाल्याने आईने चालवली पोटच्या मुलींवर कुऱ्हाड

चिकन खायची इच्छा पूर्ण न झाल्याने आईनेच आपल्या पोटच्या मुलींवर कुऱ्हाड चालविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरजपूर जिल्ह्यातील प्रेमनगर इथे कविलास त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसोबत राहातो. संध्याकाळी त्यांनी चिकन बनवलं रात्री एकत्र जेवण केल्यानंतर दोन्ही मुली झोपायला गेल्या. रात्री उशिरा कविलास आणि त्याची पत्नी दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी दोघांनाही दारूसोबत चिकन खाण्याची तीव्र इच्छा झाली.

पती-पत्नी दोघांनीही चिकन देण्यासाठी मुलींना हाका मारल्या. मात्र दोन्ही मुली गाढ झोपेत होत्या. थोड्या वेळाने कविलासही मद्यपान करून झोपी गेला. त्यानंतर आरोपी महिलेनं उठून चार कोंबड्यांचा बळी दिला आणि चिकन बनवण्यासाठी मुलींना आवाज देऊ लागली. दिवसभऱ काम करून थकल्यामुळे मुलींना जाग आली नाही. अनेकवेळा हाका मारूनही मुली उठल्या नाहीत या रागातून महिलेनं पोटच्या मुलींवर कुऱ्हाड चालवली.

कविलासने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहून पोलीस स्टेशन गाठले. कविलास यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांची पत्नी रामबाईविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of