गुन्हेगारी

भुसावळमध्ये गोळीबार; भाजप नगरसेवकासह पाच जणांचा मृत्यू

भुसावळमध्ये अंदाधुंद गोळीबारात भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी गोळीबार केला. यामध्ये रवींद्र खरात (५०) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५) मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०), सुमित गजरे हे पाच जण ठार झाले आहेत. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. जेव्हा नगरसेवक रवींद्र हे त्यांच्या कुटुंबासोबत घरी होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर रविंद्रच्या घरी देशी पिस्तूल, चाकू घेऊन घुसले आणि गोळ्या झाडल्या. हल्ला करुन हल्लेखोर तिथून पळून गेले पण नंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of