गुन्हेगारी

धक्कादायक: पतीकडून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले

बीडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पतीने  पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड येथील माजलगाव शहरातील अशोकनगर भागात ही घटना घडली. रेशमा संजय साळवे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर संजय रंगनाथ साळवे उर्फ अब्दुल रहमान असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहत्या घरात रेशमा साळवे यांची नऊ दिवसांपूर्वी निर्घृण हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचे आढळून आले. आरोपी पतीने सोमवारी कमरेपासून वरचा उरलेला अर्धवट सांगाडा नाल्याच्या काठावर जाळून नष्ट करण्याचा प्रयत्नं केला. मात्र अर्धवट जळलेल्या सांगाडयामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of