गुन्हेगारी

सराफाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरट्याने पळविले 35 लाखांचं सोनं

सराफाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चोरट्यांनी 35 लाखांचं सोनं लंपास केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर भागात घडली आहे.

शहरातील चंदनपूरी गेट भागातील सराफ व्यावसायिक झुंबरलाल बागूल हे दुकान बंद करून दुचाकीने कलेक्टर पट्टा भागातील घराकडे निघाले होते. जाताना त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत सोन्याचे दागिने ठेवले तर चांदीचे दागिने असलेली पिशवी त्यांनी दुचाकीच्या हँडलला अडकवली होती. वाटेत त्यांची दुचाकी एका बोळीजवळ आली असता दोन दुचाकींवरुन अचानक आलेल्या सहा जणांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकल्याने ते भांबावून गेले. दुचाकी उभी करुन ते डोळे पुसत असताना लुटारुंनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दुचाकी पळवून नेली. चोरट्यांनी त्यांच्याजवळील सुमारे नऊशे ग्रॅम सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ३५ लाख रुपयांचा ऐवज लुटला.

चोरट्यांनी दुकानापासून बागूल यांचा पाठलाग केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of