गुन्हेगारी मनोरंजन

आणखी एका टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी 2020 हे वर्ष हादरवून टाकणारं आहे. आणखी एक टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसू ममता’ या तेलुगू मालिकेतील अभिनेत्री श्रावणी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रेमप्रकरणातून श्रावणी हिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी देवराजा रेड्डी नावाच्या व्यक्तीवर काही आरोप केले आहेत. तो काही दिवसांपासून तिला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी श्रावणीच्या भावाने केली आहे. याप्रकरणी एस्सार नगर पोलीस ठाण्यात त्या व्यक्तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात टीव्ही9 तेलुगूने वृत्त दिले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of