गुन्हेगारी

धक्कादायक: वेदनेतून मुक्तता व्हावी म्हणून पोटच्या मुलानेच केली आईची हत्या

वेदनेपासून मुक्तता व्हावी म्हणून पोटच्या मुलानेच डोक्यात रॉड घालून 62 वर्षीय आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे. रविवारी सकाळी पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय जयप्रकाश धीबीविरोधात पालघर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मुलं आईपासून वेगळे भोईसर इथे राहात होते. दर रविवारी हे दोघं भाऊ आपल्या आई-वडिलांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी घरी जायचे. चंद्रवती या मधुमेह, रक्तदाब, मोतीबिंदूसारख्या आजारांनी त्रस्त होत्या. 29 डिसेंबरला जयप्रकाश आईला भेटण्यासाठी गेला होता. आई त्याच्यासाठी स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत होत्या. जयप्रकाशने संधी साधून आईच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. चंद्रवती म्हणजे जयप्रकाशच्या आईचा जागीच मृत्यू झाला. छोट्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जयप्रकाशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of