गुन्हेगारी

‘या’ शहरात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या 16 हजार जणांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या 16 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्या आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकानं उघडी ठेवणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

सोशल डिस्टंसिंगसह मास्कचा वापर आदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 16 हजार 400 पेक्षा अधिक नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

नियमांचं उल्लंघन केलेल्या नागरिकांवर पोलिसांनी कलम 188 नुसार कारवाई केली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर  करोनाच्यादृष्टीने रेडझोनमधून वगळण्यात आल्यानंतर कारवाईचा वेग वाढवण्यात आला होता. शहरातील बहुतांश भागात गर्दी आणि सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. तेव्हा देखील नागरिकांवर कारवाई करण्यात आली. दररोज किमान शेकडो नागरिकांवर ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of