गुन्हेगारी

पत्नीच्या त्रासाला कंटाळून लग्नानंतर 7 महिन्यातच पतीने केली आत्महत्या

लग्नानंतर केवळ 7 महिन्यातच पतीने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सतीश गायकवाड (वय 22 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश पुण्यात मेडिकल स्टोअर्समध्ये कामाला होता.  7 महिन्यांपूर्वी सतीशचा विवाह झाला होता. त्याची पत्नी एका रुग्णालयात कामाला होती. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. पत्नी, मेहुणी आणि सासू सासरे मानसिक छळ करत असल्यानं तो नैराश्येत होता. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्याने 23 डिसेंबरला राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. सतत घालून पाडून बोलणं, मानसिक छळ करणं, सातत्यानं प्रत्येक गोष्टीत अपमान करत असल्यानं सतीश नैराश्येत होता. लग्नानंतर अवघ्या 7 महिन्यात पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुणानं टोकाचा निर्णय घेतला.

सतीशच्या या अवस्थेला त्याची पत्नी आणि तिचे माहेरचे जबाबदार असल्याची तक्रार सतीशच्या आईने हडपसर पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of