गुन्हेगारी

धक्कादायक; पुण्यात मित्रानेच केली मित्राची हत्या

मित्रानेच मित्राचे 40 लाख रुपयांसाठी अपहरण करुन त्याची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना पुणे विद्यापीठात घडली आहे.

अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी – वय- १७ रा.दापोडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून उमर नसीर शेख वय- २१ रा.खडकी असे आरोपी मित्राचे नाव आहे. आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे विद्यापीठ परिसरात रविवारी पहादे अब्दुलचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुलचा मित्र उमर शेख यानेच त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमर नसीर शेख याने ‘खतरनाक खिलाडी २’ हा चित्रपट पाहिला. यातून प्रेरणा घेऊन मित्राचे अपहरण करत ४० लाख रुपयांची खंडणी उकळायची अशी योजना आखली. त्यानुसार, रात्री साडेआठच्या सुमारास दापोडी येथील अब्दुलच्या घरी जाऊन त्याला दुचाकीवरून पुण्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे घेऊन गेला. दोघांमध्ये बिअरची पार्टी झाली. त्यानंतर मात्र आरोपी उमरने मित्राचा गळा आवळून खून केला. दरम्यान, मयत अब्दुलच्या घरच्या व्यक्तीला फोन लावून ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु, मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. आरोपी उमरला कोणीतरी चुकीची माहिती दिली होती. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत अस सांगण्यात आलं होतं. आरोपीला महागडी कार घ्यायची होती.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of