गुन्हेगारी

कामगार नेते दादा सामंत यांची आत्महत्या

‘कामगार आघाडी’चे माजी अध्यक्ष, कामगार नेते दादा सामंत (वय-92) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे, तर कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका होत. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते. दादा सामंत यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडल्याचे समजते. परंतु, रात्री उशिरापर्यंत एकाही जबाबदार अधिकाऱ्याने आत्महत्येच्या वृत्तास दुजोरा दिला नव्हता. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

दादा सामंत यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. दादा सामंत यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते.  दादा सामंत यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी, तीन विवाहित कन्या गीता, नीता आणि रुता, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of