गुन्हेगारी मुंबई

धक्कादायक; क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर अत्याचार

मुंबईतील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आल्याची  मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुभम राजेंद्र खातू (वय-25, न्यू पनवेल, भगतवाडी) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी कालच क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. आरोपीची कोरोना टेस्ट घेण्यात आली असून आज संध्याकाळी त्याचा रिपोर्ट येणार आहे.

मिळालेली माहिती अशी की, आरोपी आणि पीडित महिला दोघे ही नवी मुंबईतील राहणारे आहेत. नवी मुंबई महापालिकेचे कोरोना रुग्णांना पनवेल येथील क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पनवेल तालुका पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कोरोना संशयित असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of