गुन्हेगारी

पानसरे हत्या प्रकरण: एसआयटीने तीन मारेकऱ्यांना घेतले ताब्यात

govind pansare murder

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी शुक्रवारी एसआयटीने आणखी तीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मुंबई आणि पुणे येथून यांना अटक करण्यात आली आहे.

सचिन अंदुरेसह अन्य दोघांना एसआयटीने पुणे आणि मुंबईतून ताब्यात घेतले आहे. सकाळी अकरा वाजता त्यांना कोल्हापूर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी भाकपचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळ्या झाडल्या, यामध्ये कॉ. पानसरे यांचा मृत्यू झाला.

अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई इथल्या आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतल्यामुळे पानसरे हत्येमध्ये आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या 12 वर गेली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of