गुन्हेगारी

मोबाईल चोरी करण्यासाठी, चोरांना मिळतोय मासिक पगार

Thieves

मोबाईल चोरी करण्यासाठी चक्क चोरांना मासिक पगार मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर मध्ये चोरांची टोळी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करीत असत. त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी धंतोली पोलिसांनी नेताजी मार्केट भागातून आफताब इब्ररार अन्सारी याला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर, आफताब अन्सारीनं मोबाईल चोरीची कबुली दिली. सोबतच झारखंडहून मोबाईल चोरीसाठी नागपुरात आलेल्या आठ चोरांची नावेही त्याने सांगितली.

झारखंडची ही टोळी नागपुरात खास चोरी करण्यासाठी दाखल झाली होती. त्याकरता त्यांनी जोगीनगर इथे रुमही भाड्यानं घेतली होती. सहा चोरांसह दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून आठ मोबाईलही जप्त केले. या टोळीचा म्होरक्या झारखंडला असतो. मोबाईल चोरी केल्यानंतर त्यांना कामानुसार पाच ते दहा हजार रुपये मासिक पगार हा म्होरक्या देत असे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of