worker arrested in rape case Mumbai
गुन्हेगारी

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्याला अटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

सतीश वैद्य असे या कार्यकर्त्यांचं नाव असून तो चेंबूरमधील मनसेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मनसे पक्षातील महिला कार्यकर्त्याने सतीश वैद्य याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, हिंसाचार आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी लेखी तक्रार दिली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर एफआयआर दाखल केला.

सतीश वैद्यने आपल्याला ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्याच्या बहाण्याने नेलं आणि तिथे बलात्कार केला, असा गंभीर आरोप पीडित महिलेनं केला आहे. एवढंच नाही तर यानंतर सतीश वैद्यने धमकावल्याचाही आरोप महिलेनं केला. जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर पतीला सर्व प्रकार सांगू, अशी धमकी देत ब्लॅकमेल केल्याचंही महिलेने पोलिसांनी सांगितलं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of