ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज मनोरंजन महत्वाच्या बातम्या

म्हणून सुबोध भावे नाटकात काम करणार नाही !

नाटकादरम्यान प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असल्याने अभिनेता सुबोध भावे यांचा राग अनावर झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे फोन जर असेच वाजणार असेल तर मी नाटकात काम करणार नाही असा इशारा सुबोध भावे यांनी दिला आहे. अनेक वेळा सांगून,विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण […]

ताज्या बातम्या देश ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या

टिक-टॉकवर व्हिडिओ बनविल्यामुळे ऑन-ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांचे निलंबन

गुजरात मध्ये काहि दिवसांपूर्वीच एका महिला पोलिसाने ऑन-ड्युटी असताना टिक-टॉकवर व्हिडिओ बनविल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता राजकोट येथील दोन पोलीस कॉन्स्टेबल यांनी देखील टिक टॉकवर व्हिडिओ शूट केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ऑनड्युटी असताना पीसीआरची (पोलीस नियंत्रण कक्ष) व्हॅन चालविताना पोलीस कॉन्स्टेबल अमित प्रागजीने टिक टॉकवर व्हिडिओ बनविला आणि तो व्हिडिओ शूट करण्यास  पोलीस कॉन्स्टेबल नीलेश पुनभाई […]

ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्र क्रांती सेना विधानसभेच्या 100 जागा लढविणार

महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. स्वबळावर १०० जागा लढवण्याचा निर्धार मराठा क्रांती सेनाने केला आहे. पुण्यात पार पडलेल्या मराठा समन्वयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा क्रांती सेनेने भाजप – शिवसेना युतीकडे १० जागांची मागणी केली असून समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर १०० जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं […]

ताज्या बातम्या पुणे ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

अंगात प्राण असेपर्यंत मी शरद पवारांना सोडणार नाहीः जयंत पाटील

मागील काहि दिवसांपासून माध्यमांवर भाजपकडून मला ऑफर आली असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. मात्र गेल्या पाच वर्षापासून मला ही ऑफर आली आहे. मात्र अंगात प्राण असेपर्यंत मी शरद पवारांना सोडून जाणार नाही. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पक्ष अनेकांनी सोडला असले तरी […]

ताज्या बातम्या देश ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांची अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते अविभाजित आंध्र प्रदेशात […]

ताज्या बातम्या मनोरंजन महत्वाच्या बातम्या

प्रियांका-निकचा हॉट लूक

सध्या प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस सोशल मीडियावर फार ऍक्टीव्ह दिसत आहे. प्रियांका आणि निक कायम फोटोमधून एकमेकांवर किती प्रेम करतात हे दाखवत असतात. आता देखील त्या दोघांचा एक सुंदर फोटो पीसीने शेअर केला आहे. त्यात प्रियांकाने पिंक कलरचा स्विमवियर घातला आहे तर निक शर्टलेस दिसत आहे. View this post on Instagram My […]

ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज मनोरंजन महत्वाच्या बातम्या

अक्षय कुमारचा नवीन हटके लूक

अभिनेता अक्षय कुमार यंदा बऱ्याच चित्रपटात काम करत आहे. मात्र त्याच्या पुढच्या वर्षीच्या एका सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज झाले आहे.चित्रपटाचं नाव आहे ‘बच्चन पांडे’. अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिनेमाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. यामध्ये त्याचा लूक अगदी हटके आहे. काही मिनिटांतच त्याच्या या लूकची जोरदार चर्चा सुरु झाली. यामध्ये अक्षय कुमार कपाळाला भस्म, […]

ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज मनोरंजन महत्वाच्या बातम्या

अन् वरुण धवन सेटवर पडला बेशुद्ध

  “स्ट्रीट डान्सर’या चित्रपटासाठी वरुण धवन फार मेहनत करत आहे.तो रात्र दिवस डान्स प्रॅक्‍टिस करण्याचा सिलसिला सुरू केला आहे. त्यामुळे शुटिंगदरम्यानही सातत्याने रिहर्सल केल्याने तो अगदी दमला होता. यामुळे मंगळवारी अशाच एका डान्स सीक्‍वेन्सच्या शुटिंग दरम्यान त्याला अचानक चक्कर यायला लागली. सततच्या डान्स प्रॅक्‍टिसमुळे त्याला थकवा येऊन तो सेटवर चक्क बेशुद्ध झाला होता. त्यानंतर सेटवर […]

ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महालक्ष्मी एक्‍स्प्रेसला पाण्याचा वेढा, सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरुप

मुंबई – सध्या मागच्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे मध्य रेल्वेवरील बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकली. या ट्रेनमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची तब्बल १७ तासांनंतर सुटका करण्यात यश आले आहे. सगळ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे आव्हान एनडीआरएफ, वायुदल आणि नौदल यांनी या पूर्ण केले. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी […]

ताज्या बातम्या देश ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या

महिला पोलिसाला टिक-टॉक व्हिडिओ शुट करणं पडलं महागात

एका महिला पोलिसाला टिक-टॉक व्हिडिओ शुट करणं चांगलंच महागात पडलं आहे. गुजरातमधील पोलिस ठाण्यात टिक – टॉक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे या महिला पोलिसाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलीस ठाण्यात कार्यरत असणारी महिला पोलीस अर्पिता चौधरी हिनं कामावर असताना टिक – टॉक व्हिडीओ शूट केला. पोलीस ठाण्यात असलेल्या तुरुंगाच्या समोरच […]