देश

जगभरात आज फेसबुक बंद

तरुणांमधील सर्वात लोकप्रिय असलेले फेसबुकची सेवा आज काही देशांमध्ये बंद पडली होती.  ट्विटर आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून फेसबुकवर फोटो अपलोड करायला, स्टेटस अपलोड करायला अगदी लॉगइन करायलाही अडचण येत असल्याचे म्हटले आहे. भारतातही साडेसात ते आठच्या दरम्यान युझर्सला फेसबुकवर लॉगइन करण्यास अडचण येत होती. भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, जपान, न्यू यॉर्क, अटलांटा, बर्लिन, जर्मनी मॅचेस्टर, […]

पुणे महाराष्ट्र

अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पुण्यातील शाळांना उद्या सुट्टी

गेल्या आठवड्यापासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्या, सोमवारी पुणे शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणेसह परिसरात आज देखील पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. […]

महाराष्ट्र मुंबई

लाटांनी मरिन ड्राइव्हवर फेकला 25 हजार किलो पेक्षा अधिक कचरा

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात महापूर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज मुंबईमध्ये मरीन ड्राइव्हवर दुपारी अडीचच्या सुमारास भरतीच्या ४.९ मीटर उंचीच्या लाटा उसळल्याचे पहायला मिळाले. या लाटांनी हजारो टन कचरा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर फेकला गेला आहे. हा कचरा साफ करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी मरीन ड्राइव्हवर आले. आणि त्यांचे हजारो किलो […]

महाराष्ट्र मुंबई

वसईच्या मिठागरात 400 कुटुंब अडकली; एनडीआरएफचे बचाव कार्य सुरु

वसईच्या मिठागर परिसरात 400 कुटुंब अडकली आहेत. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांचे बचाव कार्य सुरु आहेत. हेलिकॉप्टरद्वारे अनेक जणांना वाचवण्यात यश आले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास, भातसा आणि बारवी नदयांना पूर आला असून या नद्यांच्या आसपासच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे खडवलीजवळ भातसा नदीला आलेल्या पुरात एकूण ३५ नागरिक अकडकल्याची माहिती […]