लाईफस्टाईल

श्रावणात ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत

श्रावण महिन्यातील आपला आहार कसा असावा याबाबत अनेकांना माहिती नसते. मात्र या महिन्यात इन्फेक्शन होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात आर्युवेदानुसार हिरव्या पालेभाज्या शक्यतो खाऊ नयेत. या भाज्या खाल्ल्याने पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो. याशिवाय भाज्यांवर हिरव्या रंगाचे किडे असतात. अनेकदा हे किडे डोळ्यांना दिसत नाहीत आणि ते खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक आजार होऊ […]

मनोरंजन

राणी मुखर्जीचा मर्दानी 2 चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित !

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या मर्दानी 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. यशराज फिल्म्स यांच्यातर्फे करण्यात आलेल्या अधिकृत घोषणेनुसार, राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ चित्रपट १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

मनोरंजन

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी साराचे वजन होते 96 किलो !

अभिनेत्री सारा अली खानने खूप कमी दिवसांमध्येच बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये लोकप्रियता मिळविली आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान तिचा २४वा वाढदिवस साजरा करत आहे. सारा अली खान फिट असून ती नियमित वर्कआउट करताना दिसते. पण सुरुवातीचा काळ असा नव्हता. एक वेळ अशी होती की साराचे वजन 96 किलो होते. सिनेसृष्टीत […]

मनोरंजन

श्वेता तिवारीला दुसऱ्या पतीकडूनही मारहाण

छोट्या पडद्यावरची प्रसिध्द अभिनेत्री श्वेता तिवारी दुसऱ्यांदा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडली आहे. याप्रकरणी श्वेताने पती अभिनव कोहली विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अभिनव कोहलीला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक केले आहे. अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे. श्वेताने दिलेल्या तक्रारीनुसार, अभिनव तिची मुलगी पलक हिलाही मारहाण करत असे. यानंतर मायलेकींनी पोलिस ठाण्यात […]

मनोरंजन

रितेश-जेनेलिया यांनी पुरग्रस्तांना केली 25 लाखांची मदत

कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे महापूराचा सामना नागरिकांना करावा लागला. येथील जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मात्र नागरिकांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले. यामध्ये सामाजिक संस्था, मराठी कलाकार, राज्य सरकार, अनेक नागरिकांनी देखील आपापल्या परिने मदत केली आहे. अनेकांनी आवश्यक धान्य, औषधं, कपडे देऊ केले. यात मराठी कलाकारांनीही […]

महाराष्ट्र

कोल्हापूरात जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदीचे आदेश

गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूरात महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. नागरिकांना बेघर व्हावे लागले. आता पाऊस कमी झाल्यामुळे पुराचे पाणी पण कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात […]

विदेश

पाकिस्तानात 15 ऑगस्ट काळा दिवस जाहिर

पाकिस्तानात 15 ऑगस्ट  काळा दिवस म्हणून जाहिर करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या संदर्भातले एक पत्रकच जारी केले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे १५ ऑगस्ट. या दिवसाची सगळेच मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र पाकिस्तानने 15 ऑगस्ट काळा दिवस घोषित केला आहे. सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. […]

देश

विशाखापट्टणम मध्ये जहाजाला भीषण आग

विशाखापट्टणम येथे तटरक्षक दलाच्या जहाजाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 28 जणांना वाचविण्यात यश आले आहे, तर एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणमच्या समुद्रात आज सकाळी 11.30 च्या सुमारास समुद्रातील जहाजांना अन्न, पाणी पुरविणाऱ्या जहाजाला आग लागली. यामुळे या जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. यापैकी 28 जणांना कोस्ट […]

महाराष्ट्र

पुरग्रस्तांसाठी संभाजीराजेंकडून 5 कोटींची मदत

कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था, सरकार, नागरिक एकवटले आहेत. यातच आता खासदार संभारीराजे छत्रपती यांनी पुरग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत जाहीर केली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या वाट्याच्या निधीतून त्यांनी ही मदत जाहीर केली आहे. माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प […]

विदेश

भारतीय लष्कराकडून मिठाई घेण्यास पाक सैन्याचा नकार

जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. मात्र तरी आजच्या ईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाकिस्तानला मिठाईचा पुडा देण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने भारताकडून देण्यात येणारी मिठाई स्वीकारण्यास नकार दिला. हुसैनीवाला बॉर्डरवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाकिस्तानच्या सैन्याला ईदच्या निमित्ताने मिठाई पाठवण्याचा प्रस्ताव दिला मात्र पाकिस्तानच्या सैन्याकडून त्यासाठी नकार […]