kapalbhati pranayama
लाईफस्टाईल

कपालभाति प्राणायमाचे फायदे तुम्ही वाचलेत का?

कपालभाति प्राणायम हा एक योगप्रकार आहे. याचे फायदे तुम्हाला जर माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत. कपालभाति योगासन करायला सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासन स्थितीत बसा आणि हात गुडघ्यांवर ठेवा. हातांच्या सहाय्याने गुडघे पकडून शरीर ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या पूर्ण क्षमतेने दीर्घ श्वास घेत छाती फुगवा. यानंतर श्वास सोडताना पोटाला आतल्या बाजूला […]

shahid kapoor
मनोरंजन

काय… शाहिद पुन्हा लग्न करणार

अभिनेता शाहिद कपूर पुन्हा लग्न करणार हे ऐकुन तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना.. हो पण शाहिद पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती खरी आहे. ही बातमी त्याची पत्नी मीरा राजपूत हिनेच दिली आहे. मात्र शाहिद दुसऱ्यांदा जरी लग्न करणार असला तरी त्याची पत्नी मीराच असणार आहे. एका मुलाखती दरम्यान मीराने सांगितले की,  आपण दोघंही पुन्हा लग्न […]

sharad pawar criticized on uadayan raje bhosale
महाराष्ट्र

पळपुट्या नेत्यांचा आता जनताच समाचार घेईलः शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उद्यनराजे भोसले यांचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपुस समाचार घेतला आहे. लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले नेते पळपुटे निघाले, असं म्हणत त्यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. पळपुट्या नेत्यांचा आता जनताच समाचार घेईल. सोडून गेलेले नेते जनतेच्या विकासासाठी नव्हे तर स्व:ताची कातडी वाचवण्यासाठी गेले आहेत, असा घणाघातही […]

andhra pradesh tourist boat capsizes in godavari river
देश

गोदावरी नदीत बोट उलटली; 11 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपटनम येथे गोदावरी नदीत 61 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बुडाले आहेत. घटनास्थळी ३० जवानांची एनडीआरएफची दोन पथकं दाखल झाली असून बुडालेल्या पर्यटकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बुडालेल्यांपैकी आत्तापर्यंत २३ जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. अशी […]

Pakistan
विदेश

पाकिस्तानचे भारताबरोबर युध्द झाल्यास पाकिस्तानचा पराभव होईलः इम्रान खान

पाकिस्तानचे जर भारताबरोबर युद्ध झाले तर यात पाकिस्तानचा पराभव होईल असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. अल-जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. इम्रान खान यांनी भारताला दोनदा-तीनदा अणुयुध्दाची धमकी दिली आहे. मात्र त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जझीराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युध्द झाले तर पाकिस्तानाला […]

osama bin ladens son and al qaeda heir hamza bin laden dead
विदेश

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठारः डोनाल्ड ट्रम्प

अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाला असल्याचे वृत्त अमेरिकन माध्यमांनी आधीच दिलं होतं. त्यावर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी शिक्कामोर्तब केले आहे. ट्रम्प यांच्या वतीने व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘हामजा बिन लादेनचा मृत्यू हा दहशतवाद्यांना धक्का आहे. वडिलांचा दहशतवादी वारसा चालवणाऱ्याचा मृत्यू अतिरेकी […]

Indurikar maharaj
महाराष्ट्र

इंदुरीकर महाराज देणार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना आव्हान

प्रसिध्द किर्तनकार इंदुरीकर महाराज विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांविरोधात इंदूरीकर महाराजांनाच रिंगणात उतरवण्याची खेळी भाजप खेळू शकते. अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरांताना इंदुरीकर महाराजांचे आव्हान असणार असल्याचे देखील बोलले जात आहे. भाजपची महाजनादेश यात्रा थोरातांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरात पोहोचली होती. इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या मांडीला […]

Dubai airport
विदेश

‘या’ कारणामुळे भारतीय कर्मचाऱ्याला दुबई विमानतळावरुन अटक

भारतीय कर्मचाऱ्याला दोन आंबे चोरल्याप्रकरणी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. 2017 साली दुबई विमानतळावर काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने प्रवाशांच्या बॅगेमधून दोन आंबे चोरले होते. भारतात जात असलेल्या एका बॅगमधून आपण आंबे चोरल्याची कबुली देखील या तरुणाने दिली होती. “मला तहान लागली होती, मी पाणी शोधत होतो. त्यावेळी मी फळांची पेटी उघडली आणि […]

Saudi Arabia Aramco company drone attack
विदेश

सौदी अरेबियातील सगळ्यात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला

जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियातील तेल कंपनी ‘अरामको’च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये ड्रोन हल्ला झाला आहे. अशी माहिती सौदीच्या सरकारी गृहमंत्रालयाने दिली आहे. शनिवारी सकाळी सौदीच्या अरामकोच्या दोन तेल संयंत्रांवर विद्रोह्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर दोन्ही तेल कंपन्यांमध्ये भीषण आग लागली होती. दोन्ही ठिकाणी […]

Shraddha kapoor
मनोरंजन

श्रध्दा कपूर लढते ‘या’ गंभीर आजाराशी

अभिनेत्री श्रध्दा कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकतेच तिचे सोहो आणि छिछोरे असे एकापाठोपाठ एक दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर बंपर कमाई केली. त्यामुळे श्रध्दा चांगलीच चर्चेत आहे. मात्र श्रध्दाने एका मुलाखती दरम्यान एक मोठा खुलासा केला आहे. मागच्या सहा वर्षापासून ती एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे तिने सांगितले […]