महाराष्ट्र

रोहित पवार कर्जत-जामखेडमधून विजयी

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघातून पराभव केला आहे. अटीतटीच्या लढतीत मंत्री राम शिंदे यांना पराभवाचा झटका बसला आहे. कर्जत-जामखेडमधील लढत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक होती. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांसमोर भाजपचे मंत्री राम शिंदे यांचं तगडं आव्हान होतं. अवघ्या […]

पुणे महाराष्ट्र

महापौर मुक्ता टिळक आता आमदार

कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेले कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव झालेला आहे. कसबा  मतदारसंघ पुण्याचे खासदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना खासदारकीची लॉटरी लागल्यानंतर विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांचं टिळक यांना आव्हान होतं. त्यातच […]

देश

मॅन ऑफ द मॅच ठरले शरद पवार

ही विधानसभा निवडणूक प्रत्येकाच्या लक्षात राहिली ती एका वेगळ्याच कारणाने तरुणाला लाजवेल असा उत्साह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील प्रचारसभेत दिसला. वयाच्या 79 व्या वर्षी पायाला भिंगरी लावल्यागत सगळा महाराष्ट्र पिंजून काढत सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल करत महाराष्ट्राचं वातावरण त्यांनी पालटून टाकलं. त्याचा प्रत्यय आजच्या निकालात प्रत्येक पक्षाला दिसून आला असेल. महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला […]

महाराष्ट्र

कणकवलीमधून नितेश राणे आघाडीवर

नितेश राणे यांना भाजपाकडून कणकणवलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत नितेश राणे यांनी आघाडी घेतली आहे. नितेश राणे यांच्यासह नारायण राणे यांनी आपला मोठ्या फरकाने विजय होईल असा विश्वास अनेकदा व्यक्त केला आहे. नितेश राणे 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ही निवडणूक शिवसेना […]

महाराष्ट्र

शरद पावरांचे नातू रोहित पवार आघाडीवर

भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात कर्जत आणि जामखेड या मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात रोहीत पवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्याकडे १५,५५८ मंताची आघाडी झाली आहे. पिछाडी […]

महाराष्ट्र

बारामतीतून अजित दादांचा दणदणीत विजय

बारामती मतदारसंघातून अजित पवारांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला आहे. अजित पवार यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवली. आणि शेवटी अजित पवार यांनी मोठा विजय मिळविला आहे. बारामतीकरांनी मोठं मताधिक्य देऊन मला विजयी केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,  अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवार […]

महाराष्ट्र

भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण आघाडीवर

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निवडणूकीच्या निकालाचे कल आता यायला सुरुवात झालेली आहे. भोकर मतदारसंघातून रिंगणात असलेले कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे श्रीनिवास गोरठेकर हे निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही नामदेव आयलवाड यांना उमेदवारी दिली आहे. भोकर […]

महाराष्ट्र

भाजपाला धक्का; उद्यनराजे 32 हजार मतांनी पिछाडीवर

लोकसभेनंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांचे आव्हान आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले तेव्हा उदयनराजे पिछाडीवर होते. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आघाडीवर होते. उदयनराजे भोसले हे ३२ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांना कडवी झुंज दिली आहे.

महाराष्ट्र

परळीत काॅंटे की टक्कर; धनंजय मुंडे 13 हजार मतांनी आघाडीवर

परळीच्या लढतीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण परळती मुंडे बहिण-भावाची लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे आव्हान आहे. या मतदारसंघातील निवडणूक फार गाजली होती.

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात

विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होतोय. उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची […]