देश

अयोध्या प्रकरणः बाबरी मशिदीच्या उभारणीसाठी सरकारने दिले 5 जागांचे पर्याय

उत्तर प्रदेश सरकारनं सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. पंचक्रोशी परिक्रमेबाहेरील पाच जागांचे पर्याय मशिदीसाठी देण्यात आले आहेत. मात्र या पाच जमिनी अयोध्येच्या बाहेर आहेत. पंचकोशी परिक्रमा हा 15 किमीचा परिघ आहे जो अयोध्याचा पवित्र प्रदेश मानला जातो. अयोध्येनजीक असलेल्या महामार्गाजवळील पाच जागा मशिदीसाठी सुचवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. टाइम्स ऑफ […]

गुन्हेगारी

धक्कादायक: वेदनेतून मुक्तता व्हावी म्हणून पोटच्या मुलानेच केली आईची हत्या

वेदनेपासून मुक्तता व्हावी म्हणून पोटच्या मुलानेच डोक्यात रॉड घालून 62 वर्षीय आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे. रविवारी सकाळी पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय जयप्रकाश धीबीविरोधात पालघर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मुलं […]

मनोरंजन

सुनिधी चौहानचा मुलगा देतोय तिला गाण्यात साथ; पाहा व्हिडिओ

गायिका सुनिधी चौहान सध्या सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. तिने नुकताच तिच्या मुलासोबत गाणे गातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सुनिधीचा मुलगा खूप मधूर आवाजात गाणे गाताना दिसत आहे. सुनिधी चौहाननं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती ‘कटते नहीं कटती…’ हे […]

क्रीडा

वानखेडेवर ‘या’ दिवशी रंगणार आयपीएलचा पहिला सामना

आयपीएलच्या 13 व्या हंगामाची तारीख आता निश्चित झाली आहे. 29 मार्चपासून या हंगामाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर 29 मार्चला होणार आहे. आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स टीम आपल्या घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देणार आहे. मात्र, आयपीएलच्या हंगामाला मार्चपासून सुरुवात होणार असल्यामुळं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना […]

महाराष्ट्र

अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती

सनदी अधिकारी आणि ‘मेट्रो ३’ च्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना बढती मिळाली आहे. आश्विनी भिडे या आता प्रधान सचिवपदी काम पाहणार आहेत. अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली असून त्या उद्यापासून (बुधवार) आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अश्विनी भिडे यांच्या कामाचा आलेख पाहिला तर आधी एमएमआरडीए आणि आता एमएमआरसी मधल्या […]

टेक्नॉलॉजी

मोबाईल चोरीला गेलाय आता काळजी सोडा; असा शोधता येईल मोबाईल

हल्ली मोबाईल चोरीला जाण्याचा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे मोबाईल मधील माहितीचा गैरवापर होण्याचा धोका अधिक असतो. मात्र आता काळजी सोडा कारण हरवलेला मोबाईलचा शोध तुम्हाला आता घेता येणार आहे. सरकारने यासाठी पाऊल उचलले आहे. मोबईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो शोधणं कठिण असतं. मोबाईल हरवल्यानंतर एखाद्या सदगृहस्थाच्या हाती लागला तर तो परत मिळेल. […]

महाराष्ट्र

शपथविधीला गैरहजर राहिल्याचा संजय राऊत यांनी केला खुलासा

महाविकास आघाडीचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.  मात्र शिवसेनेचे नेते संजय राऊत हे मंत्रिमंडळ विस्ताराला गैरहजर होते. त्यांचे बंधू सुनिल राऊत यांना मंत्रिपद नसल्याने संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता खुद्द संजय राऊत यांनी ते का गैरहजर राहिले याचे कारण सांगितले आहे. आपण कोणत्याही शासकीय कार्यक्रमाला जात नसल्यानेच गैरहजर होतो असं […]

गुन्हेगारी

पत्नीच्या त्रासाला कंटाळून लग्नानंतर 7 महिन्यातच पतीने केली आत्महत्या

लग्नानंतर केवळ 7 महिन्यातच पतीने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सतीश गायकवाड (वय 22 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश पुण्यात मेडिकल स्टोअर्समध्ये कामाला होता.  7 महिन्यांपूर्वी सतीशचा विवाह झाला होता. त्याची पत्नी एका रुग्णालयात […]

महाराष्ट्र

मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके देणार राजीनामा

महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार कालच विधानभवनात मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांची  नाराजी आता समोर आली आहे. राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सोळंके आज (मंगळवार) दुपारी १२ वाजाता आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार […]

विदेश

सिक्रेट सांन्ता होऊन बिल गेट्स यांनी दिल्या ‘या’ महिलेला इतक्या भेटवस्तू

ख्रिसमस हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे आकर्षण म्हणजे सॅन्ताक्लॉज. सॅन्ताक्लॉज येईल आणि आपल्याला भेटवस्तू देईल या आशेने लहानमुलं सॅन्ताक्लॉजची वाट पाहत असतात. हल्ली आता अनेक कंपन्यामध्ये सिक्रेट सांन्ता हा गेम सुध्दा ख्रिसमसला मोठ्या प्रमाणात खेळला जातो.  या सिक्रेट सांन्तामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. हा खेळ जगभरात […]