क्रीडा

पुन्हा सुपर ओव्हरचा थरार; भारताचा रोमांचक विजय

भारत न्यूझीलंड चौथ्या सामन्यातही सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. मात्र सुपर ओव्हर मध्ये भारताचा पुन्हा शानदार विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या १६६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला १६५ रनच करता आल्या, त्यामुळे हा सामना टाय झाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे बॅट्समन बॅटिंगला आले. ६ बॉलमध्ये न्यूझीलंडने १३ रन केले, त्यामुळे भारताला विजयासाठी १४ रनचं आव्हान […]

मनोरंजन

स्त्रीला बदल्यात मिळते फक्त ‘थप्पड’

आगामी ‘थप्पड’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा महिलांचा विषय समोर आणणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला तापसी एक वकीलाच्या समोर बसलेली पाहायला मिळते. जी वकील तिला एक कायदेशीर नोटीस दाखवत घरी परत जाण्यास सांगते. त्यावर तापसी नकार देते. वकील तिला तिची फॅमिली स्टोरी विचारते. घरातले त्रास देतात? […]

मनोरंजन

करीनामुळे तैमुर बिघडलाः सैफ अली खान

बॉलिवूडचा प्रसिध्द स्टारकिड म्हणजे अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर. सेलिब्रेटींना जेवढी प्रसिध्दी मिळते तेवढीच प्रसिध्दी तैमुरला एवढ्या लहान वयात मिळाली आहे. सैफने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तैमुर विषयीचे काही किस्से सांगितले. तैमुर घरी कसा वागतो याबद्दल सैफला विचारले असता त्याने सांगितले की, घरात तो फार मनमानी करू लागला आहे. […]

गुन्हेगारी

आर्थिक परिस्थितीला कंटाळून बॉडीबिल्डरची आत्महत्या

‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ जिंकलेल्या बॉडीबिल्डरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अली सालेमानी असं या ३५ वर्षीय बॉडीबिल्डरचं नाव आहे. अली सालेमानी याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अली सलोमनी विरार पूर्वेकडील शिवलीला अपार्टमेंटमध्ये राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक संकटात असल्याचं म्हटलं जातं. आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावातून अलीने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक […]

देश

जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात तैनात असलेल्या पोलिसांसमोरच सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. हा तरूण नथुराम गोडसेप्रमाणे खरा राष्ट्रभक्त आहे. या मुलाचा आम्हाला अभिमान आहे, असंही हिंदू महासभेने म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाईम्स नाऊ या वेबसाईटने दिलं आहे. देशद्रोही विचारसरणीचा व्यक्तींना धडा शिकवण्याचा […]

महाराष्ट्र

भाजपच्या जवळच्या लोकांनीच भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवलाः अनिल देशमुख

भाजपशी संबंधित असणाऱ्या लोकांनीच भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवला असल्याने हा तपास एनआयएकडे देण्यात आल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी शरद पवारांनी केली होती. त्याचबरोबर इतर अनेक संघटनांनीही अशीच मागणी केली होती. सरकार त्या दृष्टीने पुढे जात असतानाच केंद्राने हे पाऊल उचलणे हे चुकीचं आहे असे मत देशमुख […]

गुन्हेगारी

धक्कादायक; जालन्यात टोळक्याची प्रेमी युगुलाला बेदम मारहाण

जालन्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमीयुगुलाला टोळक्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याघटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध आणि चीड व्यक्त होत आहे. या व्हिडिओमध्ये जालना जिल्ह्यातील एका प्रेमी युगूलाला जालनातील काही तरुणांनी मारहाण केली आहे. याबरोबरच युगूलाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली आहे. या […]

महाराष्ट्र

हा बाबा सकाळी लवकर उठून शपथ घेतो; अजित पवारांची नाशिकमध्ये टोलेबाजी

माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा. पण दहा वाजता मला बैठका आहेत. मला आमदार सांगत होते की, काही जण चर्चा करत होते, मी सकाळी इतक्या लवकर येईन का, त्यावर दुसरा म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर उठून शपथ घेत असतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. अजित पवार यांनी दिंडोरीतील […]

देश

‘सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे महात्मा गांधींची इच्छा पूर्ण’

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे CAA) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पूर्ण झाल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ झाला. माझे सरकार हे ‘सबका साथ, सबका विकास’, या धोरणाला अनुसरून चालते. गेल्या काही काळात सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला. जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० आणि […]

देश मनोरंजन

सीएए म्हणजे काळा कायदाः उर्मिला मातोडकर

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA)  म्हणजे काळा कायदा असल्याची टीका कॉंग्रेसची माजी सदस्य आणि अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांनी सरकारवर केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा हा काळा कायदा आहे. तो केवळ मुस्लिमविरोधीच नाही तर तो गरीब विरोधीही आहे, अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली. देशात सध्या सगळ्या गोष्टी हिंदू मुस्लिम या पातळीवर आणून ठेवल्या जात आहेत. पण […]