टेक्नॉलॉजी लाईफस्टाईल

इंटरनेटवर ‘या’ गोष्टी शोधत असाल तर आहे ‘हा’ धोका

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी नागरिक इंटरनेटवर कोरोना संदर्भातील माहिती शोधत आहे. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. त्यामुळे कोरोनाची कोणतीही माहिती शोधण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या तरी कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अधिकृत अॅप नाही. दरम्यान, सायबर हल्ला करणाऱ्यांनी CovidLock असा एक रॅन्समवेअर तयार केला आहे. त्यामुळं […]

महाराष्ट्र

एकच मंत्र, गर्दी करु नकाः मुख्यमंत्री

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 302 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने एकच मंत्र लक्षात ठेवा. कुठेही गर्दी करु नका. आपण या युद्धात जिंकणार म्हणजे जिंकणारच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. “सध्या उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे थंड पाणी किंवा सरबत पिणं अगदी घराघरात होत असतं. […]

महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड सोलापूरचे नवे पालकमंत्री

सोलापूरचे नवे पालकमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तथापि, वळसे-पाटील यांनी कामगार व राज्य उत्पादन शुल्क ही दोन्ही महत्त्वाची खाती सांभाळत असताना कामाच्या वाढत्या व्यापामुळे सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरून मुक्त करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांना पदमुक्त […]

महाराष्ट्र

राज्यात कोरोनाच्या दररोज 5500 चाचण्या होऊ शकतातः राजेश टोपे

राज्यात कोरोनाच्या दररोज 5500 चाचण्या होऊ शकतात अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून 13 शासकीय आणि 8 खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज 5500 चाचण्या करू शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 6323 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 5911 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे […]

महाराष्ट्र

चिंताजनक; महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 300 पार; 72 रुग्ण वाढले

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 300 पार गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आज राज्यात दिवसभरात 72 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे. एकट्या मुंबई आणि परिसरात (MMR)67 रुग्ण वाढले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची […]

क्रीडा

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी 15 वर्षाच्या शुटरने केली 30 हजारांची मदत

कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकजण मदतीसाठी पुढे धावून आले आहेत. उद्योगपती, क्रिकेटर, सेलिब्रेटी, सामाजिक संस्था यांनी सरकारला मदत केली आहे. यामध्ये आता १५ वर्षांच्या इशा सिंह या शूटरचा समावेश झाला आहे. इशाने आपल्या आतापर्यंतच्या सेव्हिंगमधून ३० हजार रुपयांची मदत दिली आहे. ३०हजार ही रक्कम आतापर्यंत आलेल्या मदतीमध्ये कमी असेल. पण […]

क्रीडा

हिटमॅन रोहित शर्माचा मदतीचा चौकार

कोरोना विरुध्दच्या लढाईत सरकारला मदत करण्यासाठी अनेकजण मदतीसाठी पुढे सरसावले आहे. यामध्ये अनेक उद्योगपती, क्रिकेटर, सेलिब्रेटी, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये आता हिटमॅन रोहित शर्माने देखील मदतीसाठी पुढे सरसावला आहे. रोहित शर्माने, ‘आपल्या देशाला पुन्हा पायावर उभे करण्याची गरज आहे. यासाठी मी पीएम केअर फंडला 45 लाख, मुख्यमंत्री मदत निधी (महाराष्ट्र) 25 लाख, […]

क्रीडा

टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहिर

कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या स्पर्धेच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. २०२१ साली २३ जुलैपासून टोकयो ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. तर ८ ऑगस्ट २०२१ ला या ऑलिम्पिकची सांगता होईल. टोकियो 2020 चे प्रमुख योशिरो मोरी यांनी अचानक बोलावलेल्या पत्रकार परिषेदत याची घोषणा केली. गेल्या काही दिवसांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी […]

क्रीडा

‘या’ क्रिकेटपटूच्या घरात सिलेंडरचा स्फोट; पत्नी जखमी

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना दुसरीकडे मात्र एका क्रिकेटपटूच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटात या क्रिकेटरची पत्नी जखमी झाली आहे. बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास याची पत्नी देवश्री बिश्वास संचिता ही स्वयंपाकघरात चहा करत होती, त्यावेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तिचा हात चांगलाच भाजला. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत देवश्री […]

मनोरंजन

तब्बल 15 वर्षांनी शक्तिमान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लहानमुलांपाठोपाठ मोठ्यांच्याही मनात ‘शक्तिमान’ या मालिकेने घर केले होते. मुकेश खन्ना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेत त्यांनी साकालेला गंगाधर आणि त्यांनीच साकारलेला शक्तिमान प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. असा हा शक्तिमान पुन्हा एकदा वाईटाचा अंत करण्यासाठी छोट्या पडद्याच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. […]