महाराष्ट्र

दिलासादायक; एकाच दिवशी 8381 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे तर दुसरीकडे कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत. आज (शुक्रवारी) एकाच दिवशी 8,381 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. त्यातील सर्वाधीक 7358 रुग्ण एकट्या मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन […]

महाराष्ट्र

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातून विनापरवाना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे आल्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देश

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन झाले आहे. त्यांनी 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा अमित जोगी यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ९ मे रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची  प्रकृती ढासळतच गेली.  काही दिवसानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात […]

पुणे महाराष्ट्र

यंदाचा पायी पालखी सोहळा रद्द

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा इतिहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागला आहे. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. यंदाच्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा पादुका घेऊन कमी लोकांमध्ये वाहन,  हेलिकॉप्टर किंवा विमान या तीन पर्यांया पैकी एकाद्वारे त्यावेळीच परिस्थिती पाहून, पंढरपूरच्या […]

देश

प्रसिध्द ज्योतिषी बेजान दारुवाला यांचा कोरोनामुळे मृत्यू

प्रसिध्द ज्योतिषी बेजान दारुवाला यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. मात्र, बेजान दारूवाला यांच्या मुलाने मात्र ही गोष्ट नाकारली आहे. बेजान दारूवाला यांचा मुलगा नास्तुर दारूवाला यांनी त्यांचा मृत्यू निमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याच म्हटलं आहे. बेजान दारुवाला हे सुप्रसिद्ध ज्योतिषी […]

देश

देशात ‘या’ तारखेपर्यंत होणार मान्सून दाखल

देशात 1 जूनला मान्सून दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान खात्याने गुरुवारी सांगितलं की, भारतासाठी चार महिने पाऊस पडणं फार महत्वाचे आहे. कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता शेतीवर अवलंबून आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतात झालेल्या पावसामुळे, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेतून आराम मिळू शकेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन दिवसांत […]

महाराष्ट्र

ते बाबाचं घरातलं अखेरचं जेवण ठरलं; पंकजा मुंडे झाल्या भावुक

भाजपाचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 3 जून रोजी होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाबद्दल भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जनतेला एका  पोस्टच्या माध्यमातून भावनिक साद घातली आहे. पुण्यतिथीच्या दिवशी गडावर कोणीही गर्दी करु नये, घरातच गोपीनाथ मुंडे यांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि त्यांच्या फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं […]

पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 7012 वर

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 7012 वर पोहोचली आहे. पुण्यात काल (28 मे) दिवसभरात 369 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 310 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र

सोलापूरात पुन्हा 74 कोरोनाचे रुग्ण सापडले

सोलापूरात पुन्हा 74 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोलापूरात आता कोरोना रुग्णांची संख्या 822 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 72 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 321 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज, शुक्रवारी सकाळी कोरोनाशी संबंधित 166 चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात 60 पुरूष व 14 महिलांसह 74 पॉझिटिव्ह रूग्ण […]

महाराष्ट्र

पिंपरीत दिवसभरात वाढले 46 कोरोना रुग्ण

पिंपरीत आज दिवसभरात 46 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 311 वर पोहचली आहे. यामधील काही रुग्ण पुण्यातील भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा आणि खडकी येथील आहेत त्यामुळे पिंपरी-चिंंचवडकरांना घाबरण्याचे कारण नाही. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत  चाललेला आहे.  आजपर्यंतची उच्चांकी संख्या करोना रुग्णांनी गाठली. पुण्यातील काही […]