महाराष्ट्र

म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, तरी देखील मुंबई परिसरातील अनेक नागरिक घराबाहेर वाहने काढून फिरताना दिसत आहे, हे अजिबात अपेक्षित नसल्याचे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले आहे. कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे […]

पुणे महाराष्ट्र

आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांचा कोरोना पॉझिटीव्हचा अहवाल आला आहे. त्यांना बिर्ला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघात जाऊन अनेकदा परिस्थितीचा आढावा घेतला होता. […]

विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात ‘या’ देशाने केले अटक वॉरंट जारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह आणखी काही जणांविरोधात इराणने अटक वॉरंट जारी केले आहे. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी  3 जानेवारीला ठार झाला होता. अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये हा हल्ला केला होता. या हल्ल्याला अध्यक्ष ट्रम्प आणि इतर 30 अधिकारी जबाबदार असून त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरावा अशी […]

महाराष्ट्र

संपूर्ण राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या […]

गुन्हेगारी

‘या’ शहरात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या 16 हजार जणांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या 16 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्या आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकानं उघडी ठेवणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे. सोशल डिस्टंसिंगसह मास्कचा वापर आदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 16 हजार 400 […]

महाराष्ट्र

राज्यात यापुढे लॉकडाऊन नाहीः राजेश टोपे

राज्यात यापुढे लॉकडाऊन नसणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात केली आहे. राज्यात यापुढे लॉकडाउन असणार नाही तर अनलॉक दोन आणि तीन असणार आहे. असे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत याची चिंता फारशी नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढते आहे त्याची चिंता जास्त आहे असंही टोपे यांनी […]

महाराष्ट्र

नवी मुंबईत पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन

नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत पुन्हा एकदा 7 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नवी मुंबईतील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन 7 दिवसांसाठी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. […]

महाराष्ट्र

‘पतंजलीच्या औषधाला राज्यात मान्यता नाही, खोट्या जाहीरातींना नागरिकांनी बळी पडू नये’

पतंजलीने कोरोनावर काढलेल्या औषधाला राज्यात मान्यता नाही त्यामुळे नागरिकांनी या औषधाच्या खोट्या जाहीरातींना बळी पडू नये असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित देशमुख उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  पुढे बोलताना देशमुख म्हणाले, महाराष्ट्राचे गृहमंत्री […]

महाराष्ट्र

कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; एकाच दिवसात 4841 रुग्ण वाढले

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. एकाच दिवसात 4,841 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिड लाखांच्या घरात पोहोचली आहे. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 1350 ने वाढला आहे. राज्यात एका दिवसात 192 मृत्यूंची नोंद झाली. यातले 109 मृत्यू मागच्या 48 तासांमधील, तर उरलेले 83 मृत्यू मागच्या कालावधीतील आहेत. सध्याचा राज्यातला मृत्यूदर 4.69 टक्के एवढा […]

मनोरंजन

धक्कादायक; Tiktok स्टार सिया कक्कडची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर त्याचे चाहते अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. ही घटना ताजी असतानाच 16 वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्कडने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. टिकटॉक स्टारच्या मॅनेजर अर्जुन सरीननं सांगितलं की, बुधवारी रात्री एका व्हिडिओच्या कोल्याबरेशनवरून सियाशी त्याचं […]