मनोरंजन

‘त्या’ बातम्यांवरुन अमिताभ बच्चन संतापले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला असल्याच्या अनेक खोट्या बातम्या आणि अफवा काही वेळापासून पसरविल्या जात होत्या. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं ट्वीट बिग बींनी केलं आहे. सध्या अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयामध्ये आहेत.  अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांवर असे सांगण्यात येत होते […]

महाराष्ट्र मुंबई

‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परिक्षा नको’

सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात  याव्यात अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या आहेत. अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. […]

देश विदेश

धक्कादायक; अमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2600 रुग्ण आढळतायेत

अमेरिकेत दर तासाला कोरोनाचे 2 हजार 600 रुग्ण आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला करोना व्हायरस हा प्रकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. त्यांनी या व्हायरसला चायना व्हायरस वगैरे अशी नावंही ठेवली. तसंच सातत्याने या मुद्द्यावरुन चीनवर टीकाही केली. मात्र आता त्यांनी त्यांचा सूर बदलला आहे. देशातली कोरोनाची स्थिती त्यांना […]

महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असल्याचा निर्णय 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. खारेपाटण पंचक्रोशीतील आणि रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 25 गावांच्या सरपंचाच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला आहे.कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन होणं अनिवार्य असेल. तरच बाजारात प्रवेश देण्यात येईल, असा एकमुखी निर्णय सरपंचाच्या या बैठकीत घेण्यात […]

महाराष्ट्र

‘या’ जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार

कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर कोल्हापूर जिल्हयात घरीच उपचार करण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केली आहे. त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांना निर्देश देण्यात आले असून लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या देखरेखीखाली उपचार होतील. सध्याच्या घडीला दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत. अर्थात यासाठी संबंधित रुग्णाच्या घरी स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था असणे […]

पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यात पुन्हा कडक लॉकडाऊन

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील भोर आणि वेल्हा या दोन तालुक्यात आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून 31 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. मागील काही दिवसांपासून या तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून भोर प्रशासनाने 31 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. […]

देश

कोरोनाने मोडला आतापर्यंतचा रेकॉर्ड; 24 तासांत 45,720 नवे रुग्ण

कोरोनाने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 24 तासांत 45 हजार 720 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांत 1 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 लाख 38 हजार 635 इतकी झाली आहे. आतापर्यंत सात […]

महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात कोरोनाचे 10,576 नवे रुग्ण

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरात 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता  3 लाख 37 हजार 607 वर पोहोचली आहे. तर आज 280 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत 12,556 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज 5552 रुग्ण बरे होऊन घरी गेले […]

देश

कर्नाटक राज्य झालं लॉकडाऊन फ्री

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उद्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू नसल्याची घोषणा केली आहे. आता कर्नाटक हे लॉकडाऊन फ्री राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. “उद्यापासून राज्यात लॉकडाउन होणार नाही. लोकांनी आता कमावर परतायला हवं. अर्थव्यवस्थेला हातभार लागणं हे गरजेचं आहे. […]

देश

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्रीअमरनाथ श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यावर्षीची अमरनाथ यात्रा 21 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान ही यात्रा सुरू राहणार होती. याआधी जूनमध्ये श्राइन बोर्डाने बालटाल भागातून यात्रेचा मार्ग निश्चित केला होता. पण रस्ता पूर्णपणे तयार नसल्याने त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर […]