अर्थ

‘पारले जी’ कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची होणार कपात ?

ऑटोमोबाईल कंपन्यानंतर आता खाद्य उत्पादनातही मंदी आल्याचे चित्र आहे. प्रसिध्द बिस्कीट ब्रॅड असलेली पारले जी कंपनीतूनही 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याची शक्यता आहे. उपभोक्त्यांकडून बिस्किटांची मागणी घटली आहे. असे कंपनीचे म्हणणे आहे.

पारले प्रोडक्ट कंपनीचे प्रमुख मयांक शाह यांनी फायनान्स डेली या वृत्तसंस्थेशी बोलताना, जवळपास 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे म्हटले आहे. पारले बिस्कीटच्या किंमतीवरील जीएसटी कमी करावी, अशी मागणी केली आहे. ग्राहकांना कमी पैशात बिस्कीट पुरविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे केवळ 5 रुपये आणि त्याहीपेक्षा कमी किमतींच्या पॅकेटमध्ये आम्ही ग्राहकांना बिस्कीट उपलब्ध करुन देत आहोत. त्यामुळेच, केवळ 100 रुपये किलो किंवा त्यापैकी कमी किंमतीतीतील बिस्कीटकांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी कंपनीने केली आहे. तसेच, सरकारने आम्हाला प्रोत्साहन न दिल्यास, आमच्या सर्वच फर्ममधून नाईलाजास्तव 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांनी कपात केली जाईल, असे शाह यांनी म्हटले आहे

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of