अर्थ

मंदी; महिंद्रानेही 1500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

सध्या जगभरात मंदीचे सावट आहे. आणि याचा सगळ्यात जास्त फटका भारतातील ऑटोमोबाईल कंपन्यांना बसला आहे. आता मारुती सुझुकी नंतर महिंद्रानेही 1500 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे मंदीच्या झळा कर्मचाऱ्यांना बसू लागल्या आहेत.

ऑटोमोबाईल सेक्टरशी जोडधंद्यांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जमशेदपूरमध्ये टाटा मोटर्सने उत्पादन घटविले आहे. यामुळे या कंपनीला स्पेअर पार्ट पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी टाळे ठोकले आहे. जवळपास 30 कंपन्या बंद झाल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती इन्शुरन्स, सेवा आदी क्षेत्रात निर्माण झाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of