अर्थ

मारुती, महिंद्रा, टोयोटाच्या विक्रीत मोठी घट

आपण असे म्हणतो की, चारचाकी घेणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील वाहन विक्री कमी झाल्याचे समोर आले आहे.

शनिवारी मे मधील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर झाली. यामध्ये मारुती, महिंद्रा, टोयोटाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या वाहन विक्रीत 22 टक्‍क्‍यांची घट होऊन ती केवळ 1,34,641 युनिट एवढी झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने 1,72,512 कार विकल्या होत्या. कंपनीची देशांतर्गत विक्री मे महिन्यात 23 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 1,25, 552 एवढी झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने देशात 1,632,200 कार विकल्या होत्या. मे महिन्यात कंपनीची निर्यात 2.4 टक्‍क्‍यांनी कमी होऊन ती केवळ 9,089 एवढी झाली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of