अर्थ

हिरे व्यापाऱ्यांनाही मंदीचा फटका; 15 हजार कारागीर बेरोजगार

हिऱ्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतलाही मंदीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात 15 हजार कारागीर बेरोजगार झाले आहेत. हिऱ्यांचे अनेक छोटे-मोठे उद्योग बंद झाल्यामुळे कारागीरांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

सूरतचा हिरे व्यापारी जगभर प्रसिद्ध आहे. इथं जगातील १० पैंकी ९ हिरे तयार होतात. देश-विदेशातील लोक हिऱ्यांच्या व्यापारासाठी सूरतमध्ये दाखल होतात. त्यामुळेच इथल्या हजारो-लाखो कारागिरांचे संसार उभे राहतात. परंतु, अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या ‘ट्रेड वॉर’चा परिणाम या उद्योगावरही जाणवतोय. त्यामुळे हे उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of